कंत्राटी सफाई कामगारांना कामावर घ्या अन्यथा निदर्शने – आयटकचा इशारा

चोपडा, प्रतिनिधी | तालुक्यातील अडावद चोपडा, विटनेर, या गावातील कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांना ठेकेदाराने कामावरून कमी केले असून त्यांना त्वरित रुजू न केल्यास दि. १४ जानेवारी रोजी चोपडा येथील जिल्हा उपरूग्णालयासमोर काळे मास्क घालून निदर्शने आंदोलन करण्यात येईल असा इशारा जळगाव जिल्हा आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना आयटकने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, चोपडा येथील जिल्हा उपरुग्णालयात ठेकेदाराच्या हाताखाली अडावद चोपडा, विटनेर, या गावात एक ते सात वर्षे कोविड काळात कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून सेवा देत आहेत. याकाळात आपला जीव धोक्यात घालून या सुशिक्षित बेरोजगारी केवळ १० हजार रुपये वेतनावर तेही अनियमित होते तरीही काम केले. पण त्यांना दोन महिन्यापूर्वी ठेकेदारांनी त्यांना कामावरून कमी केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. या कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घ्यावे अशी मागणी जळगाव जिल्हा आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना आयटकने केली आहे कर्मचाऱ्यांना त्वरित कामावर न घेतल्यास येत्या १४ जानेवारी रोजी चोपडा जिल्हा उपरुग्णालयासमोर सकाळी ११ वाजता काळे मास्क घालून निदर्शने करण्यात येतील असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन तसेच कर्मचारी ऋषिकेश महाजन निलेश माडी मयुर नेवे सुनील पाटील राकेश नवल पाटील मंगला साबळे धारा सिंग चवरे यांनी जिल्हाधिकारी , दवाखाना व्यवस्थापन, तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

Protected Content