मुंबई प्रतिनिधी | राज्य सरकारने काल काढलेल्या नियमावलीत ब्युटी पार्लर आणि जीम बंद करण्याचे निर्देश दिले असतांना आज यात सुधारणा करून निर्बंधांसह जीम आणि पार्लर सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
राज्य सरकारने काल रात्री नवीन नियमावली जाहीर केली आहे. यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लावण्यात आली असून इतर बाबींमध्येही कठोर नियम लावण्यात आले आहेत. यात सुधारणा करत प्रशासनाकडून ब्युटी पार्लर आणि जिमवरील निर्बंधात शिथिलता देण्यात आले आहेत, तसे सुधारीत आदेशही काढले आहेत. ब्युटी पार्लरला ५० टक्के क्षमतेनं परवानगी देण्यात आली आहे. तर जिममध्येही ५० टक्के क्षमतेनं परवानगी असणार आहे. दोन ड़ोस घेतलेल्यांनाच या ठिकाणी जाता येणार आहे. तसेच मास्कचा वापर बंधनकारक असणार आहे. राज्यात कोरोनाच कहर वाढल्याने राज्य शासनाकडून काल नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यात निर्बंध आणखी कडक करण्यात आले होते. शनिवारी जारी केलेल्या आदेशात जिम आणि ब्युटी पार्लर बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र आज सुधारीत आदेश काढत काही निर्बंधासह जिम आणि ब्युटी पार्लर सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, आज पंतप्रधान मोदी यांनी सायंकाळी आपत्कालीन बैठकीचे आयोजन केले आहे. यात राष्ट्रीय पातळीवर काही कठोर निर्णय घेण्यात येणार असल्याचे मानले जात आहे. या संदर्भात सायंकाळी घोषणा होऊ शकते.