Home न्याय-निवाडा न्या.रंजन गोगोई यांच्याविरोधातील षडयंत्राचा तपास निवृत्त न्यायाधीशाकडे

न्या.रंजन गोगोई यांच्याविरोधातील षडयंत्राचा तपास निवृत्त न्यायाधीशाकडे


ranjan gogoi 1
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) निवृत्त न्यायाधीश ए. के. पटनायक यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात रचण्यात आलेल्या कथित लैंगिक छळाच्या षडयंत्राचा तपास करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

 

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावरील कथित लैंगिक छळाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. यावेळी न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. निवृत्त न्यायाधीश ए. के. पटनायक यांच्या नेतृत्वात ही समिती काम करणार आहे. प्रतिज्ञापत्रातून करण्यात आलेला आरोप आणि पुराव्याच्या आधारे ही समिती चौकशी करणार असून सीबीआय, आयबी आणि दिल्ली पोलिसांना या समितीला सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या षडयंत्राची चौकशी झाल्यानंतर एका बंद लिफाफ्यात अहवाल कोर्टाला सादर करण्याचे निर्देश पटनायक यांना देण्यात आले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound