भुसावळ (प्रतिनिधी) शहरात आज (दि.२५) सकाळी संत आसाराम बापू यांच्या अनुयायांनी त्यांच्या ८३ व्या अवतरण दिनानिमित्त भव्य हरिनाम संकीर्तन यात्रा काढली होती. हा दिवस विश्व सेवा-सत्संग दिवस म्हणूनहि साजरा केला जातो.
या हरिनाम संकीर्तन यात्रेत बापूंचे शहर व परिसरातील अनुयायी मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी सजवलेल्या ट्रॅक्टरवर सजीव देखावा तयार करण्यात आला होता.