दिल्ली (वृत्तसंस्था) प्रियांका गांधी –वाड्रा मोदींविरोधात निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे. कारण वाराणसीतून काँग्रेसने अजय राय यांना तिकीट दिले आहे. यामुळे वाराणसीत मोदीं विरुद्ध प्रियांका लढत टळलीय.
काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची अजून एक यादी जाहीर केली असून या यादीत वाराणसी आणि गोरखपूरच्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियांका गांधींना पाहिल्यावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची आठवण येते अशी भावना व्यक्त केली. त्यामुळे प्रियांका गांधींनी वाराणसीहून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवावी अशी मागणी जोर धरायला लागली होती. तर प्रियांका गांधींनीही वाराणसीहून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु आता वाराणसीतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.