Home राजकीय पंतप्रधानांना कुर्ता पाठवायचे पण…मत देणार नाही : ममता बॅनर्जींचे

पंतप्रधानांना कुर्ता पाठवायचे पण…मत देणार नाही : ममता बॅनर्जींचे


 

Mamata and Modi
 

कोलकाता (वृत्तसंस्था) ममता बॅनर्जी या कडवा राजकीय विरोध करत असल्या तरीही दरवर्षी न चुकता मला कुर्ता आणि मिठाई पाठवतात,असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेता अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीत खासगी आयुष्यातील हितसंबंधाना उजाळा दिला होता. त्यावर मी अनेक प्रसंगी अनेकांना मिठाई पाठवली असेल पण त्यांना मत देणार नाही, असे प्रतिउत्तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहे.

 

 

माझ्या कट्टर विरोधकांमध्ये असलेल्या ममता बॅनर्जी यांना याबद्दल कळाले तेव्हापासून त्या स्वत: माझ्यासाठी कुर्ता निवडतात आणि दरवर्षी उपहार पाठवतात असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. या अशा वक्तव्याने लोकसभा निवडणुकीत कदाचित मला नुकसान होऊ शकते असेही पंतप्रधान मोदी म्हणाले होते. यावर हुगली जिल्ह्यातील प्रचार सभेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी लोकांना रसगुल्ला पाठवते, पुजेदरम्यान उपहार पाठवते आणि चहा पाजते पण मी त्यांना एकही मत देत नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound