Home आरोग्य मू.जे. महाविद्यालयात शिबीराच्या पहिल्या दिवशी ९३५ लसीकरण (व्हिडिओ)

मू.जे. महाविद्यालयात शिबीराच्या पहिल्या दिवशी ९३५ लसीकरण (व्हिडिओ)

0
28

जळगाव, प्रतिनिधी | युवासेना जळगाव महानगर व मूळजी जेठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महापालिका यांच्या सहकार्याने मूळजी जेठा महाविद्यालय येथे १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित लसीकरण शिबीराचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

युवासेना सहसचिव विराज कावडीया यांच्या पुढाकाराने लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. संजय भारंबे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, युवासेना विस्तारक किशोर भोसले व युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हायुवाधिकारी शिवराज पाटील, मू. जे. महाविद्यालयाचे कुलसचिव जगदीप बोरसे, युवासेना महानगर युवाधिकारी विशाल वाणी, स्वप्निल परदेशी, जळगाव शहर महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. राम रावलानी उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबीराच्या पहिल्या दिवशी ९३५ विद्यार्थ्यांनी कोव्हॅक्सिन लस घेतली. येणाऱ्या तिन दिवसात मूळजी जेठा महाविद्यालयाचे सुमारे ५००० विद्यार्थ्यांचे लसीकरण युवासेने मार्फत करून घेण्यात येणार आहे.

महापौर जयश्री महाजन यांनी यावेळी सांगितले की, महाविद्यालयातच लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत होणार आहे. या शिबिराचा मू. जे. महाविद्यालयातीलच नव्हे तर १५ ते १८ वयोगटातील युवक युवतींनी देखील लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी युवा सेना राबवीत असलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. पुढील ३० दिवसात जळगाव शहरातील प्रत्येक महाविद्यालयात लसीकरण शिबीराचे आयोजन करून १५ ते १८ वयोगटातील ३० हजार विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्याचे युवासेनेचे मानस असल्याचे युवासेना महाराष्ट्र राज्याचे सहसचिव विराज कावडीया यांनी सांगितले. याविषयी शहरातील प्रत्येक महाविद्यालयाशी युवासेनेचे पदाधिकारी जाऊन संपर्क साधणार आहेत. यशस्वीतेसाठी युवासैनिक वैष्णवी खैरनार, जितेंद्र बारी, पियुष गांधी, यश सपकाळे, गिरीष सपकाळे, सागर हिवराळे, संकेत कापसे, अमित जगताप, प्रितम शिंदे, तेजस दुसाने, जय मेहता, अमोल मोरे, अंकित कासार, आर्यन सुरवाडे, चेतन कापसे, शंतनू नारखेडे, सयाजी जाधव, दिनेश पाटील, राहूल पोतदार, यांनी परिश्रम घेतले.
७ जानेवारीपर्यंत १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मू. जे. महाविद्यालय येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत युवासेनेतर्फे लसीकरण सुरू राहणार आहे. जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन युवासेना महानगरतर्फे करण्यात आले आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1087405235424691

 


Protected Content

Play sound