नवी दिल्ली वृत्तसंस्था । साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी असलेल्या व सध्या जामिनावर असलेल्या साध्वीला भाजपने भोपाळमधून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली आहे. मालेगाव स्फोटात मरण पावलेल्या एका मुलाच्या कुटुंबीयांनी कोर्टात धाव घेत साध्वीला निवडणूक लढविण्यास परवानगी देऊ नये व तिचा जामीन रद्द करावा, अशी मागणी पीडितांच्या वतीनं केली होती. यावर झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. एखाद्या आरोपीला निवडणूक लढण्यापासून रोखणे, हा निर्णय कोर्टाच्या अखत्यारीत नाही. याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानंच घ्यावा, असं न्यायमूर्ती विनोद पडाळकर यांनी निकालात नमूद केले. या निकालामुळे साध्वीला दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.