जळगाव प्रतिनिधी । घरघुती कार्यक्रमाच्या निमित्ताने नातेवाईकांच्या चिंचोलीहून कानळदाकडे दुचाकीने ट्रिपल सिट जात असतांना वळणावर दुचाकी घसरल्याने मागे बसलेल्या माय-लेकी जखमी झाल्याची घटना आज बुधवार सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. दोघांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, प्रकाश निळे रा. चिंचोली ता. यावल हे आपल्या पत्नी शोभा प्रकाश निळे (वय-37) आणि मुलगी मनिषा प्रकाश निळे (वय-19) हे दुचाकीने ट्रिपलसिट चिंचोलीहून कानळदा येथे जात असतांना विदगावजवळी विदगाव येथे असलेल्या वळणावर दुचाकी घसरल्याने मागे बसलेल्या माय-लेकी खाली पडल्याने दोघांना दुखापत झाली. दोघांना तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.