यावल( प्रतिनिधी) काल झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची सरासरी जरी मागील निवडणुकीच्या तुलनेत कमी असली तरी या निवडणुकीच्या मतदानात महिलांचा सहभाग हा लक्ष वेधणारा होता. येथे काल सकाळपासुन शहरातील विविध ठिकाणी असलेल्या मतदान केन्द्राबाहेर मतदानासाठी पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांचा सहभाग मोठा दिसून आला.
रावेर विधान सभा क्षेत्रातील एकुण १लाख ९५ हजार ७०६ च्या सरासरी ६५.८५ टक्के मतदान झाले असून यात पुरुष मतदार १ लाख ४१ हजार१४२ तर ९१ हजार ५६४ महिला मतदारांनी मतदाना हक्क बजावला. यात अल्पसंख्याक समाजातील महिलांनी मतदानासाठी ४० ड्रिग्रीच्या तापमानातही घेतलेला सहभाग हा लक्ष वेधणारा होता. मतदानाची टक्केवारी पाहता रावेर लोकसभा मतदारसंघातुन मतदानाची घटलेली टक्केवारी निकालाचे गणित बिघडवु शकते, असे जाणकारांचे मत आहे.