फैजपूर येथील व्यापाऱ्याला ४ लाखात गंडविले; चार जणांविरोधात गुन्हा

फैजपुर ता. यावल प्रतिनिधी । शहरातील शिवकॉलनी परिसरात राहणाऱ्या व्यापाऱ्याला कंपनीची फ्रंचायशी देतो असे सांगून ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी फैजपूर  पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मयुर अरुण मंडवाले (वय-२८) रा. भुसावळरोड, शिवकॉलनी फैजपूर ता. यावल हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मयूर मंडवाले हे व्यापारी असून त्यांचे जळगाव येथील काही व्यापारी परिचयाचे आहेत. ११ ऑगस्ट २०२० ते आजपर्यंत साईराम बालाजी पाटील, परमेश्वर बालाजी पाटील दोन्ही रा. हैदराबाद यांनी मयूर मंडवाले यांना डेनिम कंपनीचे फ्रन्चायशी  ४५ दिवसात फर्निचर व माल देऊन शोरूम ओपन करून देऊ असे खोटे बोलून ४ लाख रूपयांचा चेक स्वरूपात घेतले. त्यानंतर त्यांनी अद्यापपर्यंत कुठल्याही पद्धतीचा शोरूम व माल दिलेला नाही. याप्रकरणी मयूर मंडवाले यांनी फैजपूर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. तक्रारीवरून साईराम बालाजी पाटील, परमेश बालाजी पाटील दोन्ही रा. हैदराबाद, नामदेव ध्रुवकुमार शिंपी रा. दादावाडी, योगेश रमेश कुलकर्णी रा. गिरणा टाकी जळगाव या चार जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल पाटील करीत आहे

Protected Content