जळगाव (प्रतिनिधी) एप्रिल हिटचे दिवस असल्यामुळे सकाळ लवकर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळी सातपासूनच रांगा लागल्या होत्या. मतदार यादीत नाव शोधण्यासाठी काही केंद्रावर गर्दी होती. त्यामुळे मतदान केंद्रावरील सहायता केंद्रातील कर्मचाऱ्यांची धांदल उडाल्याचे दिसत होते.
मतदारांची मोठी संख्या, पोलचीट न मिळणे, मतदार यादीतून वगळण्यात आलेली नावे यामुळे मतदार यादीत नाव शोधण्यासाठी गर्दी उसळली होती. राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही यादीत नावे शोधून देण्यात गुंग होते. परंतु अनेकांची नावेच मतदान यादीत नव्हती. मात्र अशांची संख्या फार नव्हती. मतदान याद्या कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे अशिक्षित व वृद्धांना नाव शोधण्याची तारांबळ उडत होती. वॉटर ॲपच्या माध्यमातून तरुण अबालवृद्धांचे आपले नाव शोधण्याचा प्रयत्न करीत होते.