Home Cities यावल यावलच्या विद्यार्थ्याची विभागीय कुस्ती स्पर्धेत निवड

यावलच्या विद्यार्थ्याची विभागीय कुस्ती स्पर्धेत निवड

0
17

यावल प्रतिनिधी | यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्याची फैजपुर येथील धनाजी नाना महाविद्यालयात आयोजित आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत विभागीय पातळीवर निवड करण्यात आली.

यावल येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी सत्तार सुपडू तडवी याची फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात आयोजित आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत विभागीय पातळीवर निवड करण्यात आली.

त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, एम,डी. खैरनार, संजय पाटील, .एस.आर.गायकवाड, डॉ. एस .पी. कापडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. सत्तार तडवी यास क्रीडा विभाग प्रमुख डॉ. पी .व्ही .पावरा यांचे विद्यार्थ्यास मार्गदर्शन लाभले आहे .


Protected Content

Play sound