एरंडोल प्रतिनिधी । येथे सकाळी सात वाजेपासून लोकसभेच्या मतदानास प्रारंभ झाला असून अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा दिसून येत आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी प्रचंड चुरस निर्माण झाल्यामुळे यावेळेस मतदान हे जास्त होणार का ? याबाबत उत्सुकता लागून आहे. या अनुषंगाने आज सकाळी सात वाजेपासून मतदानास प्रारंभ करण्यात आला आहे. महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील आणि महाआघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्यात जोरदार लढत होणार असून दोन्ही बाजूच्या समर्थकांनी मतदानासाठी जोर लावल्याचे चित्र आज दिसून आले. दरम्यान, माजी उपनगराध्यक्षा छाया दाभाडे यांनी पहिले मतदान केले. तर मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी जनतेला आपला हक्क बजावण्याचे आवाहन केले.
पहा : एरंडोल येथील मतदानाबाबतचा हा व्हिडीओ.