विद्यापीठात ‘युवकांचे स्वप्नातील विकसीत भारत’ विषयावर व्याख्यान

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळे अंतर्गत असलेल्या स्वामी विवेकानंद अध्ययन व संशोधन केंद्रातर्फे ‘युवकांचे स्वप्नातील विकसीत भारत’ या विषयावर मुंबई येथील प्रा. सुजाता दळवी यांचे व्याख्यान झाले.

 

प्रा. दळवी म्हणाल्या की, स्वामी विवेकानंदांच्या विचाराने चालल्यास आपला देश महासत्ता होईल. त्यासाठी देशातील तरुणांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून देणे गरजेचे असून त्यांच्या शक्तीचा वापर देशसेवेसाठी केला पाहिजे. नोकरी मागणाऱ्यापेक्षा नोकरी देणारे व्हा, संकटाना घाबरून पळायचे नसते तर संकटांचा सामना करायचा असल्याचे सांगितले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विचारधारा प्रशळेचे संचालक प्रा.डॉ. अनिल डोंगरे होते. ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे कोणतेही संकट आले तर ते संकट दुर होण्यासाठी त्याच्या मुळापर्यंत युवकांनी जायला पाहिजे. तसेच दुसऱ्यांना घडवता घडवता आपणही आपोआप घडत असतो. त्यासाठी स्वामी विवेकानंद यांना वाचले पाहिजे. त्यांचे विचार अंगीकारले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे प्रमुख प्रा.डॉ.मनीष जोशी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सुभाष पाटील याने करून दिला.

 

सुत्रसंचालन कविता पालवे हिने केले. आभार वैशाली सुरवाडे हिने मानले. यावेळी प्रा.जान्हवीताई केळकर, महेश गोरडे, प्रा.सुनिल कुलकर्णी, प्रा.दिपक सोनवणे, प्रा.उत्तम मदणे, सुभाष पवार, महेश जडे, समाधान अहिरे, तुषार पाटील तसेच विद्यार्थी व विद्यार्थिंनी मोठया संख्येने उपस्थित होते.

Protected Content