कंजरवाडा येथे अवैधरित्या दारू विकणाऱ्यावर कारवाई

जळगाव प्रतिनिधी – जळगाव शहरातील कांजरवाडा येथे अवैधरित्या देशी, विदेशी दारु विक्री करणाऱ्या एकावर 22 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता कारवाई करत असतांना दारू विकणारा फरार झाला मात्र त्याच्या ताब्यातील असे एकूण 36 हजार 616 रुपयांचा माल ताब्यात घेतला असून त्याच्यावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील कांजरवाडा येथे अवैधरित्या देशी, विदेशी दारु विक्री करणाऱ्या श्याम मनोहर गारंगे हा जाखनी नगर कंजरवाडा येथे गैरकायदा विनापास परवाना देशी,विदेशी तसेच गा.ह.भच्या दारुची चोरटी विक्री करत असतांना मिळून आला. घराचे आडोशाला प्लास्टीक कॅनमध्ये गा,ह.भ तसेच देशी, विदेशी दारु ची चोरटी विक्री करतांना दिसुन आल्याने आम्ही त्याचे वर 17-00 वा.छापा टाकला.परंतु तो आम्हांला पाहुन पळुन लागला तेव्हा त्याचा पाठलाग करत असतानाच आरोपी श्याम फरार झाला.

प्रोव्हीशन गुन्हायाचे मालाचे वर्णन खालील प्रमाणे, 1) 4160/- रु.कीच्या ऑफीसर चाईस कंपनीच्या विदेशी दारुच्या 32 बाटल्या प्रत्येकी 180 एमएल मापाच्या प्रत्येकी 130 /- रु, किच्या सिलबंद बाटल्या. 2) 4992 /- रु.कीच्या टंगो पंच कंपनीच्या देशी दारुच्या 96 बाटल्या प्रत्येकी 180 एमएल मापाच्या प्रत्येकी 52 /- रु, किमतीच्या सिलबंद बाटल्या. 3) 2184 /- रुकीच्या जॅकपॉट बडीशेप कंपनीच्या देशी दारुच्या 42 बाटल्या प्रत्येकी 180 एमएल मापाच्या प्रत्येकी 52 /-रु,किच्या सिलबंद बाटल्या. 4) 1280 /- रुकीच्या टुबर्ग स्ट्रॉग कंपनीच्या विदेशी दारुच्या 8 बाटल्या प्रत्येकी 750 एमएल मापाच्या प्रत्येकी 160/- रु, किच्या सिलबंद बाटल्या. 5) 24000 /- रुकीची सहा प्लॅस्टीक कॅन प्रत्येकी 80 लिटर मापाच्या त्यामध्ये 400 लिटर तयार गा.ह.भ.ची दारु असे एकूण
36616 /- रुपयांचा मुद्दे माल जप्त केला असून पोलीस कॉन्स्टेबल मनोज धेशव सुरवाडे यांच्या फिर्यादीवरून विरुद्ध मुंबई दारुबंदी अधिनियम कलम 65 (ई) प्रमाणे एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी सहा.फौ. अतुल वंजारी, पोना नितीन पाटील, पोकॉ सतिष गर्जे यांना सूचनेवरुन ही कारवाई केली.

Add Comment

Protected Content