किनगाव येथील भवानी माता मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील भवानी मातेच्या मंदीराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठान सोहळ्याला गुरूवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी करण्यात आले असून शुक्रवारी १० डिसेंबर रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील किनगाव भवानी माता मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवस चालणारा हा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सुरुवात बुधवारी ८ डिसेंबर सायंकाळी गावातून आभार व महिलांच्या सहभागाने लक्षवेधी दिंडी काढण्यात आली होती. पारंपरिक पद्धतीने बैलगाडीवर आई भवानी मातेची मूर्ती  ठेवून मिरवणूक काढण्यात आली आहे. गुरूवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता चोपडा येथील चंद्रकांत नाईक व निलेश अजमेरा, रामचंद्र पाटील पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत मुर्तीचा जार्णोध्दारकरण्यात आला. ९ आणि १० डिसेंबर रोजी  दोन दिवस महापूजा, मूर्ती प्राणप्रतिष्ठा असून शुक्रवारी १० डिसेंबर रोजी महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.  कार्यक्रम यशस्वितेसाठी रामचंद्र पाटील, चंद्रकांत नाईक, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र ठाकूर, विठ्ठल गाणे, दिनेश सुतार, साहेबराव ठाकूर, मुन्ना महाजन, राहुल पाटील, मोहन पाटील, योगेश भांडे, बबलू पाटील, चंद्रशेखर पाटील, आबा महाजन, चेतन जोशी, विवेक पाटील, विष्णुकांत पाटील, शामराव सोनवणे, योगेश पाटील, कैलास कोळी, रवी पाटील, सुपडू सुरवाडे, देविदास महाजन, प्रकाश कुंभार यांच्यासह आदी परिश्रम घेत आहे.

Protected Content