छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम चौकातून तरुणाचा मोबाईल लंपास

जळगाव,प्रतिनिधी | शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम चौकातून मोबाईलवर बोलत पायी चालत असलेल्या विद्यार्थ्यांचा धुमस्टाईल येवून मोबाईल लांबविल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी सोमवार, ६ डिसेंबर रोजी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

धनंजय महाजन ( वय २५) हा तरुण शिक्षणाकामी जळगावातील स्वातंत्र्य चौक येथे राहतो. तो मूळ धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रूक येथील रहिवासी आहे. धनंजय हा रविवार, ५ डिसेंबर रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम चौकातून पायी मोबाईलवर बोलत जात होता. याचदरम्यान दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी काही कळण्याच्या आत धनंजय याचा मोबाईल हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी धनंजय याने सोमवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक किशोर पवार हे करीत आहेत.

Protected Content