निवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणेची तयारी पूर्ण – जिल्हाधिकारी (व्हिडीओ )

WhatsApp Image 2019 04 21 at 8.52.31 PM

जळगाव (प्रतिनिधी) सतराव्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठीची तयारी पुर्ण झाली आहे.  अवघे ४८  तासांचा अवधी उरला असुन सायंकाळी ६  वाजेला प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे. दोन्ही लोकसभा मिळून जिल्ह्यात ३४  लाख ३१  हजार ४८५  मतदार आहे. तर मतदान पोस्टल ईबॅलेट पेपरव्दारे १५  हजार २८७   नोंदविण्यात आले आहे.  २६  हजार १३६  मतदान केंद्र आहे. मतदान केद्रावर सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात अआल्याची  माहिती आज पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिली.

 

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतदानसाठी लागणारे साहित्य व इव्हीएम मशिन व्हीव्हीपॅड या यंत्राची सर्व तापासणी करून सिंल बंद केले आहे. ही यंत्र किवा बीएलओसाठी असणार्‍या ६६० गाड्यावर जीपीएस लावण्यात आले आहे. २२ रोजी पासुन सकाळी ८  वाजेपासुन सर्व यंत्र हे मतदान केद्रावर रवाना होणार आहे. सर्व मतदान केद्रावर पाणी, जेथे शेड नसेल त्याठिकाणी शेड, रॅप, मेडिकल किट,  पाळणाघर याच्यासह  अंपगासाठी व्हिलचेअर ७०० ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. तर अंधासाठी ब्रेललिपची मतदान पत्रिका व बोडे याची सोय करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी ६ वाजेला मॉकपोल घेण्यात येणार आहे.  त्याशिवाय मतदान प्रक्रिया सुरू होणार नाही असे जिल्हाधिकारी ढेकणे यांनी सागितले.

असा असणार पोलीस बंदोबस्त

पोलिस बंदोबस्त – पोलिस अधिक्षक एक, अपर पोलिस अधिक्षक २ , एसडीपीओ ११ , पोलिस निरिक्षक २७, एपीआय/ पीएसआय १६४, पोलिस कर्मचारी ४  हजार ४९४, होमगार्ड १  हजार ३९२ याच्यासह ३ सीआरपीएफ तुकड्या, ३ मध्य पोलिस फोर्सच्या तुकड्या, १  रेल्वे पोलिस फोर्स  असा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या निवडणूक प्रकियेसाठी ३२  हजार ५२९  कर्मचारी अधिकारी वर्गासह २  हजार ७५ केंद्रिय कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. जळगाव  मतदार संघातील आठ तालुक्यात १६  हजार ९१७  कर्मचारी तर ३  हजार ६७४ अधिकारी तर रावेर मतदार संघात १० हजार २४४  कर्मचार्यांसह १  हजार ६४४ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. इव्हिएम,व्हिव्हिपॅटसह मतदान साहित्य मतदान केंद्रांवर पोचवण्याची तसेच या केंद्रावर मतदारांना आवश्यक असलेल्या मुलभुत सोयी सुविधा आहेत किंवा नाही, दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअर, रॅम्प, दिव्यचक्षुंसाठी मार्गदर्शक आदींची व्यवस्थांची पहाणी पूर्ण झाली असून २२  रोजी  सर्व मतदान केंद्रावर साहित्य पोहचणार आहे याचं बरोबर २३  रोजी सकाळी ६  वाजेला  मॅकपोल  घेण्यात येणार आहे याची सर्व तयारी झाली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढेाकणे यांनी माहिती दिली.

 

संवेदनशिल मतदान केद्र 

जिल्हयातील विधानसभा मतदारसंघानुसार जळगाव शहर २ ,  ग्रामीण भागात ५  क्रिटीकल तर सामाजिक संवेदनशिल ५  असे मतदान केंद्रांसह अमळनेर १० ,पाचोरा येथे १ असे एकुण २३ , तर रावेर मतदार संघात चोपडा ८ ,रावेर १९ ,भुसावळ १५ , मुक्ताईनगर ३  असे सुमारे ४५  मतदान केंद्र क्रिटीकलसह सामाजिकदृष्टया संवेदनशिल आहेत. या केंद्र परीसरात सुरक्षा व्यवस्थादेखिल तैनात करण्यात आली आहे.

जळगाव, रावेर लोकसभा मतदार संघातील  मतदान केंद्र 

जळगाव लोकसभा मतदार संघात २  दोन हजार १३  मतदान केद्र आहे. १९  लाख २५  हजार ३५२  मतदार आपला हक्क बजावणार आहे. यामध्ये १०  लाख ८  हजार ८१८ पुरूष, ९  लाख १६  हजार ४७०  महिला मतदार आहेत. त्यामध्ये तृतीय पंथी 64 मतदार आहे. तर रावेर लोकसभा मतदार संघात  १ हजार ९०६  मतदान केंद्र आहे. यात १७  लाख ७३  हजार १०७  मतदार असुन यात १४  लाख ७८५  पुरूष तर १२  लाख ६  हजार १८९  महिला मतदार आहे. जिल्ह्यातील ३६२  मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ३६  मतदान केंद्र क्रिटीकल आहेत. निवडणूकीच्या कालावधीत ७१२  शस्त्र जमा करण्यात आल्याची माहितीही डॉ. ढाकणे यांनी यावेळी दिली.  जिल्ह्यात ७ हजार ९९२  सर्व्हिस मतदार आहेत. निवडणूक कामासाठी नेमणूक असलेल्या १५ हजार २८७  मतदारांना टपाली मतपत्रिका तर ईटीपीबीएस प्रणालीद्वारे ७ हजार ६१९  मतदारांना मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी जिल्ह्यातील २ हजार १११  ठिकाणी ३ हजार ६१७  मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर २६ हजार १३६  अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

 

 

 

 

Add Comment

Protected Content