Home क्राईम जळगावात किरकोळ वादातून एकाला मारहाण

जळगावात किरकोळ वादातून एकाला मारहाण


जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रामनगर परिसरात क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

या संदर्भात अधिक असे की, अनिल मोहन सिंग (वय 19, रा.रामनगर दुसरी गल्ली) 20 एप्रिल (शनिवार)रोजी रात्री 20.30 वाजता घराजवळ उभा असतांना काहीही कारण नसताना संशयित आरोपी अच्चू शेख अरबाज पटेल (रा. रामनगर, दुसरी गल्ली) याने चपटा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अनिल मोहन सिंग यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात अच्चू शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound