पाचोरा प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मद्य विक्रेता संघाची (डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंट असोसिएशन) महत्वपूर्ण बैठक (दि. २५ नोव्हेंबर २०२१) गुरुवार रोजी बी.एल. पॅलेस हॉटेल येथे आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये जळगाव डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी तथा जळगाव शहर अध्यक्ष सतिष नारखेडे, सचिव पंकज जंगले, सुनिल भंगाळे, नितीन पंजाबी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न पार पडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिवसेंदिवस हॉटेल व्यवसायावर होणारी ग्राहकांकडून दादागिरी त्याच बरोबर वाढती गुन्हेगारी, अवैध दारू विक्री, बनावट दारू विक्री यावर प्रतिबंध लागावे यासाठी उपस्थितांकडून मुद्दे उपस्थित करण्यात आले. यामध्ये ग्रामीण व शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री असल्याकारणाने याबाबत शासनाच्या मदतिने एक महत्त्वपूर्ण पावले उचलण्यासाठी शासन दरबारी विनंती करणे. त्याचबरोबर शासनाला मदत करण्याचे हेतूने आपले संघटना ही राज्यभरात कार्य करणार आहे, असे जळगाव येथील भंगाळे ग्रुपचे सुनील भंगाळे भुसावळ येथील पंकज जंगले यांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.
याच अनुषंगाने पाचोरा येथे लिकर असोसिएशनची सर्व वाईन शॉप, बियर शॉप, परमिट रुम, बियरबार तसेच देशी दारू दुकानाच्या संचालक मंडळींच्या माध्यमातून पाचोरा येथील हॉटेल व्यवसायिक तुषार मराठे यांची अध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी तुषार सुरेश मराठे, उपाध्यक्षपदी अमित गोवर्धनदास रिझानी, कोषाध्यक्ष मनोज चंदूमल केशवानी, सचिवपदी राहुल बा. महाजन, उपसचिव अण्णा कानडे, सल्लागार प्रदीप मराठे, राजेंद्र धनराळे, राजेंद्र मराठे, गोवर्धनदास रिझानी यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून चेतन पवार, संजय वाघ, सुनील मराठे, कुलदीप राऊत, शेरसिंग, ललित पटवारी, वैभव पाटील, विनोद तावडे, सुशील मराठे यांची निवड करण्यात आली आहे.