Home अर्थ मिटर तपासणी थांबवण्यासाठी रिक्षा युनियन संघटनेचे निवेदन

मिटर तपासणी थांबवण्यासाठी रिक्षा युनियन संघटनेचे निवेदन

0
38

 

जळगाव प्रतिनिधी । शहरात प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू असलेल्या रिक्षा फेअर मिटर सक्तीबाबत वीर सावरकर रिक्षा युनियनने निषेध नोंदवला आहे.

कागदपत्रांची पुर्तता, गणवेश, वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत दुमत नाही. पण मिटर सक्ती ही रिक्षाचालक व प्रवाशांना संकटात टाकणारा नियम मान्य नाही असे निवेदना त्यांनी दिले आहे. कोरोना लॉकडाऊननंतर आता कुठे रिक्षाचालक, मालकांची परिस्थिती सुधारते आहे. सध्या एसटी बसची सेवा बंद आहे. अशा परिस्थितीत रिक्षाचालक खेड्यापाड्यापासून प्रवाशांना शहरात ने-आण करीत आहेत. तरी देखील अशा जाचक अटी लावू नये. मिटर तपासणी थांबवावी असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. संघटनेचे दिलीप सपकाळे, मुकुंद सपकाळे, अशोक चौधरी, एकनाथ बारी, भानुदास गायकवाड, संजय महाजन, कैलास विसपूते, अशोक नथ्थु चौधरी, वाल्मिक सपकाळे, मयंक भाटीया, विनोद सपकाळे यावेळी उपस्थित होते.


Protected Content

Play sound