Home Cities एरंडोल एरंडोल येथे जिल्हा बँकेसाठी ९४.५४ टक्के मतदान

एरंडोल येथे जिल्हा बँकेसाठी ९४.५४ टक्के मतदान


एरंडोल, प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी एरंडोल येथे ११० मतदारांपैकी १०४ मतदारांत्यांनी मतदान केले आहे. यावेळी एकूण ९४.५४ टक्के मतदान मतदारांनी केले आहे.

एरंडोल येथे वि.का. मतदारांची संख्या ३३ असून त्यापैकी एक मतदार वगळता सर्वांनी मतदान केले. तर इतर संस्था सभासद संख्या ७७ असून पैकी ७२ मतदारांनी मतदान केले. दरम्यान शहरातील काबरे विद्यालयात मतदान शांततेत पार पडले. जिल्हा बँकेवर बिनविरोध निवडून आलेले अमोल चिमणराव पाटील यांनी एरंडोल येथे मतदान केले. तसेच माजी आमदार व बँकेचे माजी संचालक महेंद्रसिंग पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अमित राजेंद्र पाटील, माजी आमदार डॉक्टर सतीश पाटील यांनी मतदान केंद्राला भेट देऊन मतदान केले. व कार्यकर्त्यांकडून मतदानाबाबत माहिती घेतली.


Protected Content

Play sound