रावेर तालुक्यात घरफोडी : ३८ हजारांचा ऐवज लंपास

रावेर, प्रतिनिधी | तालुक्यातील शिंदखेडा येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ३८ हजार रुपयाचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे.यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील शिंदखेडा येथील पंकज पंडीत महाजन यांच्या घराचा कुलुप कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. कपाटातील प पत्री पेटीतून विस हजार रुपये रोख १६ हजार रुपये किमतीची ४ ग्राम सोन्याची अंगठी दोन हजार रुपये किमतीच्या वेग-वेगळ्या देवतेच्या मुर्त्या असा एकूण ३८ हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. याबाबत पंकज महाजन यांच्या फिर्यादी वरुन अज्ञात चोरट्या विरुध्द चोरीचा गुन्ह्या रावेर पोलिस स्थानकात नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस निरिक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुरेश मेढे तपास करीत आहेत.

Protected Content