कोल्हापूर (वृत्तसेवा) पैशांच्या वसुलीसाठी सावकाराने नवविवाहीतेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना कोल्हापुरात घडली आहे. याप्रकरणी सावकारासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आहे.
संबंधित तरुणीला ब्लॅकमेल करून सावकाराने तिच्यावर बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटलेले आहे. कर्जाच्या रक्कमेची वसुली करण्यासाठी सावकाराने संबंधित कुटुंबावर दबाव आणत होता. यासाठी पीडित तरुणीला सिगारेटचे चटके देऊन मारहाणही करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी या सावकाराचे नाव उघड करण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात सावकाराला आणखी दोन व्यक्तींनीही मदत केली असून या दोघांचा शोध सुरू आहे. दरम्यान, पीडित नवविवाहीत तरुणी ही सुशिक्षित असून तिने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले असल्याचे कळतेय.