जामनेरात तांदुळाने भरलेला ट्रक पकडला : वाहक पोलिसांच्या ताब्यात

जामनेर प्रतिनिधी | बोदवडकडून आयशर ट्रॅकमध्ये कत्तलीसाठी गुरे घेऊन जात असल्याची माहिती जामनेर येथील कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी पोलिस उपनिरिक्षक किशोर पाटील यांना माहिती देत बोदवड रोडवरील रामवणाजवळ बोलावीले. मात्र वाहनात गोधना ऐवजी तांदुळाच्या गोण्या असल्याचे निदर्शनास आले. तर हा तांदुळ रेशनचा असल्याची शंका असून त्यादृष्टीने तपास करण्यात येईल असे पोलिसांतर्फे स्पष्ट करण्यात आले.

 

वरणगाव येथून कत्तलीसाठी गोधन घेऊन वाहन निघाल्याची माहिती गोपाल बुळे यांना मिळाली. माहिती मिळताच बुळे यांनी पोलिस उपनिरिक्षक किशोर पाटील यांना याबाबत माहिती देऊन बोदवड रोडवरील रामवणाजवळ बोवले. पाटील व बुळे यांनी एम.एच.४२ टी. ७४७४ या क्रमांकाची आशर दिसताच अडवली. मात्र गाडीत गोधनाऐवजी तांदुळाच्या गोण्या असल्याचे निदर्शनास आले. मात्र या गोण्या झाकुन नेत असल्याने आलेला संशय पहाता हे वाहन जामनेर येथील पोलिस निवासस्थानातील खुल्या जागेत उभे करण्यात आले. एरवी गुरांची वहातुक या आयशरमध्ये यावेळीमात्र तांदुळ असल्याचे निदर्शनास आलेले. तर हा तांदूळ रेशनचा असल्याची शंका उपस्थीत केली जात असून बुळे यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
जामनेर पोलिसात गुन्हा दाखल
सकाळी साडेआठ वाजेदरम्यान एक आयशर पोलिसांनी ताब्यात घेतली. मात्र या आयशरमुळे किरकोळ अपघात झाल्याची माहिती समोर आल्याने दुर्लक्ष केले. दरम्यान, बुधवारी जामनेर पोलिस ठाण्याच्या इन्स्पेक्षणासाठी पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे आले असल्याने पुढील कारवाईस वेळ झाला. रात्री बुळे यांच्या तक्रारीवरून जिवनावश्यक वस्तू साठवण व काळाबाजार प्रकरणी कलम ७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

Protected Content