फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या म्हैसवाडी येथे ३० वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथील ३० वर्षीय विवाहिता पती व कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १३ नोव्हेंबर रोजी विवाहिता आपल्या राहत्या घरी असतांना गावातील समाधान नारायण कोळी हा तरूण त्यांच्या घराच्या जिन्याजवळ आला. त्यावेळी संशयित आरोपीने विवाहितेचा हात पकडून शरीरसुखाची मागणी केली. याला नकार दिल्याने तुझ्या मुलांसह तुला जीवे ठार मारेल अशी धमकी दिली. व अश्लिल शिवीगाळ केली. याप्रकरणी विवाहितेने फैजपूर पोलीसात तक्रार दिली. विवाहितेच्या तक्रारीवरून १५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता फैजपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी समाधान नारायण कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे करीत आहे.