Home Cities जळगाव गुलाबराव देवकर यांच्या निवडणूक लढविण्याचा वाद सुप्रीम कोर्टात: १८ रोजी लागणार निकाल

गुलाबराव देवकर यांच्या निवडणूक लढविण्याचा वाद सुप्रीम कोर्टात: १८ रोजी लागणार निकाल

0
26

जळगाव प्रतिनिधी | माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांना घरकूल घोटाळ्यात शिक्षा झालेली असल्यामुळे जिल्हा बँक निवडणूक लढविता येऊ नये यासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. यावर आज सुनावणी पूर्ण झाली असून या प्रकरणी आता १८ रोजी निकाल येणार आहे.

जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक २१ नोव्हेंबर रोजी होत असून यात महाविकास आघाडीच्या वतीने माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र गुलाबराव देवकर यांना जळगाव येथील बहुचर्चीत घरकूल घोटाळ्यात न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना पाच वर्षे शिक्षा आणि पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. विद्यमान नियमानुसार दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास कोणतीही निवडणूक लढविता येत नाही. मध्यंतरी देवकरांच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र आता ते जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उभे राहिले असतांना त्यांच्या विरोधात उभे असणारे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि शिक्षण सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली.

यावरील सुनावणीमध्ये रवींद्र पाटील यांच्यातर्फे ज्येष्ठ विधीज्ज्ञ अमोल करांडे यांनी बाजू मांडली. गुलाबराव देवकर यांना उच्च न्यायालयाने चुकीच्या मार्गाने स्थगिती दिलेली आहे. यामुळे त्यांना निवडणूक लढविण्यास मज्जाव करावा अशी मागणी त्यांनी केली. आज न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकून घेतले. यावर आता १८ नोव्हेंबर रोजी निकाल देण्यात येणार आहे. परिणामी देवकरांना निवडणूक लढविता येणार की नाही ? याबाबत आता १८ रोजी नेमका काय निकाल येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound