Home धर्म-समाज रावेरात स्वस्त धान्य दुकानांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

रावेरात स्वस्त धान्य दुकानांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0
39


सावदा प्रतिनिधी । शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागासाठी रास्त भाव दुकानांचे जाहीरनामे काढणेसाठीची प्रक्रिया जिल्हाधिकारी जळगाव यांचे कार्यालयाकडून राबविण्यात येत आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २० नोव्हेंबर २०२१ अशी आहे.

रावेर तालुक्यातील शहरी भागातील सावदा येथील 2 स्वस्त धान्य दुकाने व ग्रामीण भागातील मंगरूळ, जुनोने, जुनी मोहमंडली, बोरखेडा, चुनवाडे, सांगवे या गावातील स्वस्त धान्य दुकानाकरिता जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. नोंदणीकृत संस्था,बचत गट,स्थानिक ग्रामपंचायती,सहकारी संस्था इ यात सहभागी होऊ शकतात. रावेर तालुक्यातील पात्र अर्जदारांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन अभिजित राऊत, जिल्हाधिकारी जळगाव, सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी व उषाराणी देवगुणे, तहसीलदार रावेर यांनी केले आहे.

 


Protected Content

Play sound