Home क्राईम दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी गळ्यातील दागिने लांबविले!

दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी गळ्यातील दागिने लांबविले!


चाळीसगाव, प्रतिनिधी| शहरातील दयानंद पुलावरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या भामट्याने विवाहितेच्या गळ्यातील ७० हजार रुपये किंमतीचे सोन हिसकावून धुम ठोकल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील मोरया नगर येथील विश्वास धर्मराज चौधरी हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास आहे. व मेहूणबारे येथील आश्रम शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान त्यांच्या पत्नी कल्याणी विश्वास चौधरी (वय-३०) ह्या रविवार रोजी सायंकाळी ७:५० वाजताच्या सुमारास शहरातील दयानंद पुलावरून जात असताना समोरून दोन इसम दुचाकीवरून जवळ आले. व त्यामधील मागे बसलेला राखाडी रंगाचा शर्ट घातलेला इसमाने कल्याणी यांच्या गळ्यातील ७० हजार रुपये किंमतीचे मिनिगंठन हे सोन हिसकावून नेले. त्यावर महिलेने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु भामट्यांनी धुम ठोकली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात कल्याणी विश्वास चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.


Protected Content

Play sound