दुचाकीची चोरी करणाऱ्या संशयिताला अंजिठा चौकातून अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील वासुदेव जोशी कॉलनीतून २६ ऑक्टोबर रोजी २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याला एमआयडीसी पोलीसांनी शहरातील अजिंठा चौफुलीवरून अटक केली आहे. एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंकुश शिवाजी सुरळकर (वय-२०) रा. इंदीरागांधी चौक धामणगाव जि. बुलढाणा असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील वासुदेव जोशी कॉलनीत राहणारे अनिल सुधाकर जाधव (वय-५२) हे कुटुंबियांसह राहतात. बांधकामाचे काम करून उदरनिर्वाह करतात. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जोशी कॉलनीत घराच्या बाधकांमासाठी दुचाकी (एमएच १९ सीसी २०७७) ने गेले. त्यावेळी त्यांनी पाण्याच्या टाकीजवळ दुचाकी लावून बांधकामच्या ठिकाणी निघून गेले. दुपारी ४ वाजेच्या सुमारास चोरट्याने २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा शोध घेत असतांना शहरातील अजिंठा चौकात अंकुश शिवाजी सुरळकर (वय-२०) रा. इंदीरागांधी चौक धामणगाव जि. बुलढाणा हा संशयास्पद हालचाल करत असल्याची गोपनिय माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यांच्या पथकातील सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, मिलींद सोनवणे व योगेश बारी आदींनी कारवाईसाठी त्याला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता संशयिताने वासूदेव जोशी कॉलनीतून दुचाकी चोरी केल्याचे कबुल केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज न्यायालयात हजर केले असता त्याला ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

 

Protected Content