भुसावळ प्रतिनिधी | येथील ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान आणि प्रभाग क्रमांक७च्या मित्र मंडळ या संयुक्त विद्यमाने अष्टविनायक कॉलनीत तिसरा लसवंत मेळावाफ आयोजित करण्यात आला. यात प्रमाणपत्रांचेही वाटप करण्यात आले.
शहरातील मिशन कवच कुंडले अभियानातून लसीकरण मोहिम राबविण्यात आली.या वेळी ज्यांनी ज्यांनी दुसरा डोस घेतला त्यांना लगेच हातोहात सर्टिफिकेट वाटण्यात आले. यावेळी कॉविशील्ड पहिला आणि दुसरा डोस आणि कॉवक्सिन दुसरा डोस देण्यात आले. सण उत्सवामुळे सध्या बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. दिवाळीपर्यंत बाजारात गर्दी कायम राहणार आहे. यामुळे कोरेाना संसर्गाचा धोकाही वाढला आहे. यासाठी मिशन कवच कुंडले अभिमान अंतर्गत लसवंत मेळावा ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान ,भुसावळ तर्फे मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रभागातील १६५ नागरिकांनी लाभ घेतला.प्रभागमध्ये लसीकरण उपलब्ध झाल्याने सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी ग्रामीण रुग्णालय मुख्य अधिक्षक डॉ. मयूर नितीन चौधरी, समाजसेवक सतिश सपकाळे,विशाल जंगले, प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. नितु पाटील, स्वप्नील सपकाळे, भूषण वराडे,तुषार कुरकुरे,किशोर शिंपी, नरेंद्र ठोसर ,गोपाळ सपकाळे ,गोकुळ सोनावणे,अजय सपकाळे ,चेतन सावकारे,तुषार कुरकुरे ,मयूर सपकाळे ,उमेश कचवे ,वरून पाटील ,भूषण वराडे यांनी उपक्रम यशस्वी साठी प्रयत्न घेतले. यावेळी कुणाल जगताप,उषा गायकवाड, कोमल तायडे,सोनाली बाविस्कर तसेच सर्व प्रभाग ७ मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभले.