Home आरोग्य फैजपूर येथील जे.टी. महाजन कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये कोरोना लसीकरण शिबीर

फैजपूर येथील जे.टी. महाजन कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये कोरोना लसीकरण शिबीर


फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी) । शहरातील जे.टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजात शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने मिशन युवा स्वास्थ अभियानांतर्गत आज विद्यार्थ्यांसाठी कोरोना लसीकरण शिबीर घेण्यात आले.

आज आयोजित केलेल्या लसीकरण शिबीरा न्हावी येथील ग्रामीण रूग्णालयाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी डॉ. अभिजित सरोदे, डॉ. मनोज चव्हाण यांचा डॉ. एन.डी.नारखेडे व डॉ. आर. डी. पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. आयोजित केलेल्या लसीकरण शिबीरात डॉ. मनोज चव्हाण यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना “एड्स अवेरनेस” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. आर.डी. पाटील,  डॉ. एन.डी. नारखेडे, डॉ. पी.एम. महाजन, डॉ. ए.एम. पाटील, डॉ. डी.ए. वारके, डॉ. के.एस. भगत यांच्यासह कॉलेजातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound