Home धर्म-समाज सावदा येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक हरचंद भंगाळे यांचे निधन

सावदा येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक हरचंद भंगाळे यांचे निधन


सावदा ता. रावेर (प्रतिनिधी)। शहरातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व जनता शिक्षण मंडळाचे सदस्य हरचंद शिवराम भंगाळे यांचे वृध्दपकाळाने वयाच्या ९७ व्या वर्षी देहावसान झाले.

हरचंद भंगाळे यांचे स्वातंत्र्य सैनिकांची संघटना उभारण्यात मोठे योगदान होते. त्यांनी अनेक विधायक उपक्रम राबविण्यात आले. ते पेशाने शिक्षक होते. खिरोदा येथे शिक्षक होते. विद्यार्थी असतांना ते धनाजी नाना चौधरी यांच्या सहवासात आले व स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. सेवानिवृत्तीनंतर ते लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत होते. खिरोदा येथील ग्रामस्वराज्य भवन उभारण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

राहत्या घरी आमदार शिरीष चौधरी, तापी परिसर विद्या मंडळाचे पदाधिकारी डाँ. एस. के. चौधरी, नंदुकुमार भंगाले, संजय चौधरी, प्राचार्य प्रमोद चौधरी, प्राचार्य व्ही. आर. पाटील, जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेवून श्रध्दांजली अर्पण केली व  त्यांच्या कार्याला उजाळा दिला.


Protected Content

Play sound