पाचोरा प्रतिनिधी | पशुसंवर्धन विभागाने लम्पी स्किन आजार आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. पाचोरा तालुक्यात सुमारे ६७ हजार जनावरे असल्याची दफ्तरी नोंद आहे. यामध्ये पाचोरा तालुक्यासाठी ११ हजार ६०० इतक्या लस उपलब्ध झाल्या आहेत.
सद्यस्थितीत जळगांव जिल्हयासह अनेक तालुक्यांमध्ये लम्पी स्किन आजाराचे संसर्ग असलेली जनावरे आढळत असल्याने पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुन त्यापैकी नांद्रा विभागांमध्ये लम्पी स्किन या आजार असलेल्या जनावरे आढळुन आल्याने या भागात जोखीमची उपाय योजना म्हणून पशुसंवर्धन विभागाने तब्बल ५ हजार जनावरांना लम्पी स्किन प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक महाजन यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, पाचोरा तालुक्यामध्ये ६७ हजार जनावरे आहेत. त्यापैकी ११ हजार ६०० लस प्राप्त झाल्या आहेत. तालुक्यात ज्या भागामध्ये लम्पी स्किन आजाराचे जनावरे आढळुन आले आहेत. त्या भागामध्ये लसीकरण मोहीम राबवुन लम्पी स्किन हा आजार लवकरात लवकर कसा आटोक्यात येईल याचे नियोजन करण्यात आले आहे. लवकरच उर्वरित लसी टप्प्या टप्प्याने जनावरांना देण्यात येणार आहेत. सदरचा आजारा विषयी शेतकऱ्यांनी दक्षता घेऊन आपल्या जनावरांची योग्य ती निगा ठेवावी. या आजारा संबंधित जनावरांमध्ये लक्षणे आढळुन आल्यास त्वरित पशुधन विकास अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
लम्पी स्किन आजारावर करावयाचे उपाय
लम्पी स्किन हा आजार जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत आहे. या आजारापासून बचाव करण्यासाठी पशु पालक शेतकऱ्यांनी कडुलिंबाचा पाला, एलवेरा व हळद याचा लेप जनावरांच्या अंगावर लावावा. तसेच दोन एम. एल. गोचिडचे औषध, दोन एम. एल. सायपर मॅथेल व दोन एम. एल. अमितराज एक लिटर पाण्यामध्ये मिसळुन त्याची फवारणी जनावरांवर करावी. या उपायाने लम्पी स्किन आजारापासुन आपल्या जनावरांचा बचाव करता येवु शकतो.