शेंदूर्णी ता. जामनेर (प्रतिनिधी)। जामनेर तालुक्यातील बिलवाडी येथे नवीन शाळा खोलीचे जि.प. सदस्या सरोजिनी गरूड, ग्रा.पं. सदस्या प्रतिभा महेंद्र पाटील यांच्याहस्ते भूमीपूजन करण्यात आले.
यावेळी माजी जि.प.सदस्य संजयराव गरूड, सरपंच यशवंत पाटील, उपसरपंच जगन तडवी, स्नेहदीप गरूड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिभाऊ पाटील, ठेकेदार मोहीत पाटील, ग्रा.पं. सदस्य गजानन पाटील, दिनकर पाटील, माजी सरपंच विजय भावसार, संभाजी गोतमारे, दीपक पाटील, महेंद्र पाटील, बबन निकम, केंद्र प्रमुख निवृत्ती जोहरे, मुख्याध्यापक सुनील परदेशी, उपमुख्याध्यापक ज्ञानेश्वर वाघ, समाधान अडागळे, श्रीराम पाटील गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बिलवाडी ग्रामपंचायतचे सरपंच यशवंत पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळ सदस्य संजय गरूड यांचा सत्कार केला तर जि.प.सदस्या सरोजिनी गरूड यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्या प्रतिभा पाटील यांनी केला.
सरपंच यशवंत पाटील यांचा सत्कार नियोजन मंडळ सदस्य संजयराव गरूड यांनी केला. यावेळी बोलतांना संजय गरूड यांनी सांगितले की ग्रामीण भागातील रस्ते , शाळा व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्न करीत आहे. कोरोना, अतिवृष्टी व इतर अनेक संकटे राज्यात आली. त्यामुळे विकासाच्या कामांचा वेग मंदावला होता. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, म्हणून निधी मिळताच विकास कामे सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने उपलब्ध होणाऱ्या निधीमधून जास्तीत जास्त ग्रामविकासाची कामे करण्यात येणार आहेत. सरपंच यशवंत पाटील यांनी आपल्या मनोगतात राजकारण विरहीत ग्राम विकास झाला पाहिजे त्यासाठी सर्वानी एकत्र आले पाहिजे, तालुक्याचे नेते संजय गरूड यांनी ग्रामविकासाला महत्व देऊन आमच्या गावच्या विकासासाठी सहकार्य करीत आहे. त्याबद्दल मी आभारी आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर वाघ यांनी केले मुख्याध्यापक सुनील परदेशी यांनी आभार मानले.