धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंपळे शिवारात असलेल्या शेतातून दीड लाख रुपये किंमतीचे डाळिंब अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार 14 ऑक्टोबर रोजी उघडकीला आले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, अलीम अमित देशमुख वय 65 रा. पिंपळे ता. धरणगाव ह. मु. गणेश मंदिराजवळ नाशिक यांचे तालुक्यातील पिंपळे शिवारात शेत आहे. त्या ठिकाणी त्यांनी शेतात डाळिंबाची लागवड केली आहे. दरम्यान सात आक्टोबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दीड लाख रुपये किमतीचे डाळिंब चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी आनंद देशमुख यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार करीम सय्यद करीत आहे.