जळगाव,प्रतिनिधी। शहरातील आंबेडकरनगरात राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उघडकीला आली असून शनिपेठ पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील आंबेडकरनगरात राहणाऱ्या लक्ष्मी सचिन सैंदाणे (वय २९) या विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवार रोजी दुपारी उघडकीला आली आहे. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयताचे कारण अध्याप स्पष्ट झालेले नसून घटनेची माहिती कळताच शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी तपासणी करुन मृत घोषित केले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास प्रकाश पाटील हे करीत आहे.