मी खालच्या जातीचा असल्याने माझ्यावर टीका ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

अकलूज (वृत्तसेवा) काँग्रेस नेत्यांनी आधी चौकीदाराला चोर म्हटले. याविरोधात चौकीदार मैदानात येताच काँग्रेसच्या नेत्यांच्या तोंडाला कुलूप लागले. आता तोंड लपवत फिरत आहे. ‘चौकीदार चोर है’ ही मोहीम चालली नाही तर आता काही व्यक्ती बोलत आहेत की, ज्यांचे आडनाव मोदी ते सर्व जण चोर का आहेत. मी खालच्या जातीचा असल्याने अनेकदा माझ्यावर टीका केली जात असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. अकलूजमध्ये आज झालेल्या सभेत ते बोलत होते.

 

मोदींनी शरद पवार यांच्यावर पुन्हा टीका केली.  मला शिवीगाळ करता-करता काँग्रेसचे नामदार आता सगळ्या समाजाला शिवीगाळ करताना दिसत आहेत. आधी त्यांनी चौकीदाराला शिवीगाळ केली, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यापूर्वी मोदींवर टीका करताना नीरव मोदी, ललित मोदी यांचा दाखला दिला होता. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देतांना आता ज्यांचे आडनाव मोदी आहे, त्यांनाही ते चोर बोलू लागले आहेत, असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.  कुटुंबाच्या बाबतीत पवार यांना मोदींविषयी बरं-वाईट बोलण्याचा अधिकार आहे. त्यांना त्यांची समज आणि संस्कारानुसार बोलण्याचा हक्क आहे, असा टोलाही मोदींनी लगावला.जे दिल्लीत बसले आहेत, त्यांना जमिनीवरील वास्तव माहीत नाही. ही गर्दी पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल. शरद पवार यांनी मैदान का सोडलं हे आता माझ्या लक्षात आलं. ते मोठे खेळाडू आहेत. वेळेआधीच ते वाऱ्याची दिशा ओळखतात. दुसऱ्या कोणाचा बळी गेला तरी चालेल, पण आपल्या कुटुंबातील कुणाचंही नुकसान होऊ देत नाहीत. त्यामुळेच ते मैदान सोडून पळून गेले, अशी टीका त्यांनी केली.

 

Add Comment

Protected Content