आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण (व्हिडिओ)

यावल,  प्रतिनिधी | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावलच्या अंतर्गत शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहात कार्यरत रोजंदारी वर्ग३/४कर्मचारी यांनी  प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने आज दि. १२ ऑक्टोबरपासून आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.

 

मागील दिड वर्षापासुन कोरोना विषाणु संसर्गाच्या संकट ओढवल्याने सदर रोजंदारी कर्मचारी हे बेरोजगार झालेला आहे. ,कारण आदिवासी विभागाला गेल्या अनेक वर्षापासुन अल्पमानधनात सेवा देत आलेले आहेत,मा.आयूक्त साहेबांच्या आदेश असतांना ही त्यांना फक्त परीपत्रक काढुन ही सन २०२०-२१ मध्ये कामावर घेण्यात आले नाही.आता या बेरोजगार कर्मचाऱ्यांनी आपले जिवन  जगाव कस?हा मोठा  प्रश्न त्यांच्यासमोर येऊन ठेपला आहे.विकास  प्रकल्प कार्यालयाच्या वतीने २० आॅगष्ट रोजी दिलेल्या आश्वसनाच्या पत्रान्वये कर्मचारी यांनी आपले नियोजीत आमरण उपोषण स्थगित केलेले होते. त्यावर अद्याप कुठलीही ठोस निर्णय किंवा कार्यवाही प्रकल्प कार्यालयाने केली नसल्याने आज प्रकल्प कार्यालयासमोर   आमरण उपोषणाला प्रारंभ करण्यात आला. या उपोषणामध्ये ७० रोजंदारी कर्मचारी सहभागी झाले आहेत.  या ठिकाणी मात्र जिल्हा प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे या जळगाव येथे बैठकीस गेल्याने मात्र कार्यालयात हजर नव्हत्या.  प्रकल्प अधिकारी या नेहमीच कार्यालयात गैरहजर राहात असल्याच्या अनेक तक्रारी व आदीवासी बांधवांची ओरड आहे.

 

या आहेत प्रमुख मागण्या

मागील शैक्षणिक वर्ष२०२० -२१चे मागविलेल्या प्रस्तावाच्या दिनांकान्वये आदेश निर्गमित करुन मानधन अदा करण्यात यावे.  सन२०२१ते २o२२ मध्ये सर्व रोजंदारी कर्मचारींना शाळा व वसतिगृहावर हजर करावे.  वर्ग-४ कर्मचारींना सार्वजनिक बांधकाम विभाग जळगांव यांचा कुशल अकुशल नविन दराप्रमाणे आदेश निर्गमीत करण्यात यावेत. मुख्यमंत्री महोदयाच्या आदेशानुसार हातावरचे पोट असणाऱ्यांना लाॅकडाऊन काळातील सरसकट मानधन अदा करण्यात यावे.

 

या उपोषणामध्ये सावकार बारेला, अल्लाउद्दीन उखर्डू तडवी, जितेंद्र शांताराम गुरव, प्रकाश भिका पाटील, अक्षय महाजन, भूषण पाटील, संतोष पाटील, ज्ञानेश्वर महाजन, देविदास कोळी, राजू धुंदले, केशव वाघ, लुकमान तडवी, याकुब तडवी आदी जवळपास ७० रोजंदारी कर्मचारी सहभागी झाले आहेत.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/582988659515702

 

Protected Content