Home धर्म-समाज सावदा शहरातील आठवडा बाजार सुरू करण्याची मागणी

सावदा शहरातील आठवडा बाजार सुरू करण्याची मागणी


सावदा ता. रावेर प्रतिनिधी । कोरोना रूग्ण आटोक्यात आल्याने सावदा नगरपालिकेने शहरातील आठवडा बाजार सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी केली आहे.

गेल्या दीड वर्षांपासून कोरोना देशात थैमान घातले होते. दरम्यान सध्या जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या नगन्य आहेत. त्यामुळे शासनाने शाळा, महाविद्यालये, धार्मीक स्थळे व इतर ठिकाणे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सावदा शहरातील बाजारपेइ ही पुर्वीपासूनचे मोठ्या प्रमाणावत आहे. सावदा शहराला कमीत कमी ४० खेडे गाव लागू असल्याने नागरीकांची सध्या अडचण निर्माण होत आहे. शहरातील नागरीक देखील बाजार सुरू करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे नगरपालिकेने सारासार विचार करून उत्पन्नाची बाजू लक्षात घेतला सावदा शहरात पुर्वी भरणारा आठवडे बाजार पुर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी नगरपालिकेकडे मागणी केली आहे.


Protected Content

Play sound