मुंबई प्रतिनिधी | फेसबुक आणि याच कंपनीची मालकी असणारे व्हाटसअप, फेसबुक मॅसेंजर आणि इन्स्टाग्रामचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे सायबर विश्वात खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, साधारणपणे आज रात्री नऊ वाजेच्या सुमारास व्हाटसअप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि फेसबुक मॅसेंजर यांची सेवा अचानक खंडित झाली. युजर्सला यावरून संदेशाची देवाण-घेवाण करणे आणि कंटेंट शेअर करण्यात अडचणीत येत असल्याने अनेक युजर्स त्रस्त झालेत. काही मिनिटांपर्यंत तर नेमके काय झाले हे कुणालाच समजले नाही. मात्र फेसबुकसह इतर सेवांना अडचणी येत असल्याचे समोर आल्यामुळे युजर्सला याबाबतची माहिती मिळाली.
खरं तर फेसबुक, व्हाटसअपसह अनेक सेवा याच प्रकारे आधी देखील खंडित झालेल्या आहेत. मात्र एक तास होऊन देखील या सेवा पूर्ववत झाल्या नसल्याने युजर्स त्रस्त झाले आहेत. तर ट्विटरवर याबाबत युजर्स मोठ्या प्रमाणात तक्रारी करतांनाही दिसून आले आहेत.