वरणगाव प्रतिनिधी । शहरातील सिद्धेश्वर नगर, आकासा नगर, राम पेठ जुने गावातील रेशन कार्डधारकांना धान्य मिळत नसून तात्काळ धान्य सुरु करा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या निवेदनाव्दारे केली आहे.
शहरात शेतमजूर शेतकरी मजूर बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र पुरवठा विभाग या नागरिकांना त्यांच्या रेशन कार्ड वर धान्य देत नसल्याची तक्रार आज जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजीत राऊत यांच्याकडे माजी नगराध्यक्ष सुनील काळे कायद्या आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. ए.जी. जंजाळे, भाजपाचे कमलाकर मराठे, हितेश चौधरी, किरण धुंदे यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले. निवेदनामध्ये वरणगाव शहरात अपंग बांधवांची सध्या संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना सुद्धा धान्य धान्याचा लाभ मिळत नाही. तसेच नवीन रेशन कार्ड मिळण्यासाठी वरणगाव शहरात शिबिर घेण्यात यावे, अशा मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली.
यावेळी डॉक्टर अभिजित राऊत जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कडे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी उपस्थित होते. चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर राऊत यांनी सदर बंद रेशन कार्डधारकांना रेशन चालू करण्यासंबंधी तात्काळ कार्यवाही करतो. अशा प्रकारचे आश्वासन यावेळी भाजपाच्या शिष्टमंडळास दिले व जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी तात्काळ भुसावळचे तहसीलदार धिवरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला व वरणगाव शहरात जनतेच्या सुविधेसाठी एक शिबिर घेऊन बंद रेशनकार्डधारकांना तसेच अपंग बांधवांना शासनाच्या रेशन धान्याचा लाभ मिळाला पाहिजे, यासंबंधी तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना भ्रमणध्वनीवरून तहसीलदार धिवरे यांना देण्यात आल्या.