Home Cities भुसावळ भुसावळ येथे ना. नितीन गडकरींची दुपारी २ वाजता सभा

भुसावळ येथे ना. नितीन गडकरींची दुपारी २ वाजता सभा

0
41

nitin gadkari

भुसावळ (प्रतिनिधी) रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार रक्षाताई  खडसे यांच्या प्रचारासाठी शहरातील संतोषी माता हॉल येथे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची जाहीर सभा दुपारी दोन वाजता  आयोजित करण्यात आली आहे.

 

 

भुसावळ शहराचे तापमान सध्या ४४ डिग्री सेल्सिअस सुरू असल्याने उन्हापासून बचाव होण्याकरिता सभेचे आयोजन शहरातील संतोषी माता हॉलमध्ये करण्यात आले आहे.  केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे भाषण सर्वांना ऐकायला मिळाले पाहिजे याकरिता पाच ते सहा हजार प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सकाळपासूनच पोलिस प्रशासनाने बंदोबस्त ठेवलेला आहे. केंद्रीय मंत्री येणार असल्याने वाहतूक शाखेने मुख्य मार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे. या सभेला भाजपा शिवसेना आठवले गट मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound