Home Cities जळगाव चित्ररथ, पथनाट्याद्वारे जिल्हाभरात होणार मतदान जनजागृती

चित्ररथ, पथनाट्याद्वारे जिल्हाभरात होणार मतदान जनजागृती

0
43

WhatsApp Image 2019 04 15 at 6.26.23 PM

जळगाव (प्रतिनिधी )  लोकसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढवी यासाठी मतदान जनजागृती करण्यात येत आहे. यांतर्गत केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयातंर्गत क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्यावतीने मतदान जनजागृती चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये दररोज पंधरा मतदान केंद्रावर पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती करण्यात येणार आहे.

 

याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर,  निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम,  उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे,  जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके,  तहसीलदार (महसूल) मंदार कुलकर्णी,  निवडणूक नायब तहसिलदार अनंत कळस्कर,  स्वीप सहाय्यक डॉ. मिलिंद बागुल,  क्षेत्रिय प्रचारक उल्हास कोल्हे,  योगेश पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, दिशा बहुद्देशिय संस्थेचे विनोद ढगे,  सचिन महाजन,  रोशन गांधी,  दुर्गेश आंबेकर,  देवराज बोरसे,  अरविंद पाटील,  अवधूत दलाल,  बापूराव पाटील यांनी पथनाट्य सादर केले.  हा चित्ररथ १५  ते २१  एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये दररोज पंधरा मतदान केंद्रावर पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती करणार ण्यात येणार  आहे. हा चित्ररथ १५  एप्रिल रोजी जळगाव शहर,  १६ एप्रिल रोजी जळगाव ग्रामीण, १७  एप्रिल रोजी अमळनेर, १८ एप्रिल रोजी एरंडोल व पारोळा, १९ एप्रिल रोजी धरणगाव, २० एप्रिल रोजी पाचोरा व भडगाव आणि २१  एप्रिल रोजी चाळीसगाव तालुक्यातील मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदारामध्ये जनजागृती होण्यासाठी पथनाट्य सादर करणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound