यावल प्रतिनिधी । चोपडा बऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा या मागणीची निवेदन आज सोमवारी पंचायत राज समितीचे अध्यक्ष संजय रायमूलकर यांना जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सुर्यभान पाटील यांनी दिले आहे.
जळगाव जिल्ह्यात आज दि.27 सप्टेंबर रोजी पंचायत समिती तीन दिवसांसाठी दाखल झाली आहे. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची महत्त्व पूर्ण बैठक आज सकाळी साडेदहा वाजता शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती रवींद्र सुर्यभान पाटील यांनी चोपडा बऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्ता तात्काळ दुरुस्ती करण्यात यावा यासंबंधीचे निवेदन पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार संजय रायमुलकर यांना दिले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की चोपडा बऱ्हाणपूर अंकलेश्वर हा महामार्ग अतिशय महत्त्वाचा आहे.
तसेच मध्यप्रदेश येथे जाण्यासाठी हा मार्ग उपयुक्त सोयीचा आहे.दोन वर्षात रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडलेले आहे. खड्ड्यांमुळे अनेकांचे अपघात होऊन जीव गमावलेला आहे. या रस्त्या तात्काळ नवीन करण्यात यावा अशी आग्रहाची मागणी सभापती रविंद्र पाटील यांनी पंचायत राज समितीचे अध्यक्ष संजय रायमुलकर यांना केली. सोबत जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील होते. पंचायतराज अध्यक्ष रायमूलकर यांनी सांगितले की आपण केलेली मागणी ही जनहिताची असून तात्काळ या मागणीची दखल घेतली जाईल असे आश्वासन दिले.