Home क्राईम ओमकार नगरातून एकाची मोटारसायकल लांबविली

ओमकार नगरातून एकाची मोटारसायकल लांबविली

0
37
two wheelar thift


जळगाव प्रतिनिधी । शहरातील ओमकार नगर परिसरातून खाजगी नोकरी करणाऱ्या व्यक्तीची १२ हजार रुपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, नरेंद्रकुमार भीमराव बोरसे (वय-४१) रा. विश्राम नगर ता. पोलीस स्टेशन समोर येथे राहतात. २० सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ते शहरातील ओमकार नगर येथे कामाच्या निमित्ताने आले होते. त्यांनी त्यांची मोटरसायकल माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्या घरासमोर लावली. अज्ञात चोरट्याने त्यांची मोटारसायकल चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी नरेन्द्र कुमार बोरसे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक भरत चव्हाण करीत आहे.


Protected Content

Play sound