यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील राजोरा व हल्ली मुक्काम भुसावळ येथील प्रवीण श्रीपत भारंबे यांचा मुलगा शुभम भारंबे हा मास्टर ऑफ मेकॅनिकल इन मॅनेजमेंट या उच्च शिक्षणासाठी लंडन येथे नुकताच रवाना झाला आहे.
शुभम भारंबे याने बारावीपर्यंत शिक्षण हे के. नारखेडे विद्यालय भुसावळ येथे पूर्ण केले आहे. तसेच कोकण ज्ञानपीठ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मुंबई येथून बी.ई. मेकॅनिकल ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी मिडलसेक्स युनिव्हर्सिटी लंडन यात विद्यापीठात उच्च शिक्षण घेणार आहे. शुभम याने मास्टर इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन इन मॅनेजमेंट या विषयाची निवड केली आहे. त्याला उच्च शिक्षणासाठी युनिव्हर्सिटीने स्कॉलरशिप सुद्धा दिलेली आहे. शुभम रिटायर सहाय्यक पोलीस आयुक्त एन. एस. राणे यांचा नातू आहे. त्याचे नातेवाईक व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले