Home धर्म-समाज रावेर येथील साई मंदिर संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत विचवे यांची सर्वानुमते निवड

रावेर येथील साई मंदिर संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत विचवे यांची सर्वानुमते निवड

0
49

रावेर प्रतिनिधी । शहरातील अष्टविनायक नगरातील साई मंदिर संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत विचवे तर सचिवपदी सेवानिवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापिका आशालता राणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यात उपाध्यक्षपदी सुनील(बुधा) महाजन यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

गुरूवारती २३ रोजी अद्वैत संत साई बहुउद्देशीय संस्थेची मासिक सभा संस्थेचे अध्यक्ष गोकुळ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यात गोकुळ महाजन यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने,त्यांनी राजीनामा दिला होता.त्या ठिकाणी अध्यक्षपदासाठी उपस्थित सभासदांनी चंद्रकांत विचवे यांचे नांव सुचवल्याने एकमताने अध्यक्षपदी तर सचिवपदी सेवानिवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापिका आशालता राणे यांची निवड करण्यात आली आहे.यात उपाध्यक्षपदी सुनील (बुधा) महाजन यांची फेर निवड झाली आहे. या बैठकीला गोकुळ महाजन,सुनील सुरेश महाजन,सुनील(बुधा) महाजन, पी एम महाजन, जे.एस.पाटील, नीलकंठ रुले, संजय महाजन, सागर पाटील, माजी उपाध्यक्ष राजेश महाजन उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound