Home धर्म-समाज अ.भा. मराठा महासंघाच्या यावल तालुकाध्यक्षपदी धिरज पाटील

अ.भा. मराठा महासंघाच्या यावल तालुकाध्यक्षपदी धिरज पाटील

0
41

यावल प्रतिनिधी । अखिल भारतीय मराठा महासंघाच्या यावल तालुका अध्यक्षपदी धीरज प्रभाकर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती एक वर्षासाठी केली असून राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे नियुक्तीपत्र आज शुक्रवार २४ सप्टेंबर रोजी दिले आहे.

नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, धीरज प्रभाकर पाटील यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या कालावधीत आपले कार्य समाधानकारक व प्रगतीपथावर झाल्यास या नियुक्तीचा कार्यकाळ वाढवण्यात येईल, तसेच या निर्णयावर आपल्या स्थानिक पातळीवर निवडलेल्या आखातरित्या तालुका समिती कार्यान्वित कराव्यात. लवकर संघटनेतर्फे राज्यात प्रत्येक जिल्ह्यात मराठा संपर्क अभियान राबवण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. .

त्यांच्या निवडीबद्दल धीरज पाटील यांचे यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील, धनंजय चौधरी, अजय पाटील, प्रा. मुकेश येवले, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील, अॅड देवकांत पाटील, अभय महाजन, धिरज कुरकुरे, रमेश पाटील, डॉ हेमंत येवले आदी समाज बांधव व मित्रमंडळीच्या वतीने स्वागत व अभीनंदन करण्यात येत आहे.

 


Protected Content

Play sound